मराठी पत्रकारीतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान भारतरत्न ,विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (भीमराव रामजी आंबेडकर) यांचे वडील रामजी सकपाळ हे इस्ट इंडिया कंपनीत म्हणजे ब्रिटीश सरकार कडे सुभेदाराची नोकरी करत होते आणि त्या काळी कंपनीस कारकुनाची गरज असल्याने भारतीय नागरिकांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले होते पुढे १८५७ साली सक्तीचे शिक्षण बंद करण्यात आले मात्र फलटनितल्या अस्पृश्यांना शिक्षणात गोडी निर्माण झाली होती त्यामुळ स्वताच्या मुलांना शिक्षित करत असत डॉक्टर आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली झाला आणि त्याचे शालेय शिक्षण व बालपण सातारा ,रत्नागिरी आणि मुंबई येथे गेले आणि याच वेळी भारतात स्वातंत्र लढ्याची चळवळ सुरु होती आणि इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्वच थरातील जातीधर्माचे लोक लढत होते हा लढा तीव्र करण्यासाठी तसेच या चळवळीतील लोकांचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी मध्यम होते त्यामुळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म होण्याआधी म्हणजे १७ व्या शतकात पासून बरयाच समाजसुधारकांनी वर्तमान पत्रे सुरु केली . वृत्तपत्राचा इतिहास संवाद शास्त्राचा महापंडित मार्...
Comments
Post a Comment